जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

आज वाशी येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ !

भारतीय जनता पक्षाच्या वतीने २ एप्रिल या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. वाशी येथील ब्लू डायमंड हॉटेल येथून या गौरव यात्रेचा प्रारंभ दुपारी २ वाजता होणार असून सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे, अशी माहिती आमदार गणेश नाईक यांनी दिली.

आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्म आणि हिंदुत्वावरील आक्रमणे थोपवायची असतील, तर हिंदू जागृत झाले पाहिजेत. आता हिंदू जागृत झाला, तरच धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी.

सिक्कीममध्ये भूस्खलनात सापडले ६ सैनिक  

भारतीय सेना दलाच्या सैनिकांना प्राणाची बाजी लावून अजय ढगळे आणि अन्य ५ सैनिकांना शोधून काढले. अजय ढगळे पार्थिव ३ एप्रिल या दिवशी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.

सावरकरांचे विचार तळागाळांत पोचवून सकारात्मक पद्धतीने काँग्रेसला विरोध करणार ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष

विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीतील छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेला प्रारंभ होणार असून जेलनाक्यामार्गे ही यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पोचणार आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास !

भालावली, राजापूर येथील युवतीवरील अत्याचाराचे प्रकरण रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील भालावली येथील अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत आणि वारंवार तिच्यावर अतिप्रसंग करणार्‍या नीलेश देवजी गुरव या ३३ वर्षीय तरुणाला रत्नागिरी जिल्हा पॉक्सो न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि २६ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. Ratnagiri News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला 20 … Read more

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्नछत्र !

‘‘यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग, तसेच अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक कार्यरत असतात. त्यांना पोटभर जेवण मिळावे, याकरता ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने भोजन देण्यात येते.

चिपळूण येथील हिंदु युवतीचा धर्मांध कुटुंबियांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अतोनात छळ !

लव्ह जिहादच्या दुष्टचक्रात सापडलेल्या आणि ‘श्रद्धा वालकर’ होण्यापासून वाचलेल्या अशा युवतींसाठी शासन आतातरी जिहाद्यांच्या विरोधात कायदा करणार का ?

अमेरिकेतील ५६ मोठ्या शहरांतील नागरिकांचे गावांकडे स्थलांतर !

असेच चित्र सध्या युरोपातील स्विडन, ब्रिटन, फिनलंड, नॉर्वे इत्यादी देशांतही दिसू लागले आहे. याचा परिणाम अनेक घटनांवर झाला आहे. विशेष म्हणजे महसुलावर याचा परिणाम दिसून आला आहे.

बंगालमध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात मारहाण

यातून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यस्था आपल्याला दिसून येते. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षांना पोलीस मारहाण करत असतील, तर ते सामान्य लोकांशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !