८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, ३ धर्मांधांना अटक !
पांढरकवडा (यवतमाळ), ८ जानेवारी (वार्ता.) – येथील नागपूर-भाग्यनगर मार्गावरून तेलंगाणात कत्तलीसाठी जाणार्या २ मालवाहतूक वाहनांत १२१ गोवंशियांना कोंबून नेण्यात येत होते. याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून वाहन पकडले. ६ जानेवारी या दिवशी पहाटे केळापूर पथकर नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. यात २ मालवाहतूक वाहनांसमवेत ८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ३ धर्मांधांना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकाराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना आणि सत्तेत हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांनाही गोवंशियांची तस्करी होते, ही स्थिती पोलिसांचा धाक नसल्याचेच दर्शवते ! |