जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्नछत्र !

श्री देव जोतिबा आणि यात्रेत नाचविल्या जाणाऱ्या सासन काठ्या

कोल्हापूर – जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने गायमुखावर २ ते ६ एप्रिल या कालावधीत अन्नछत्र आयोजित केले आहे. गेल्या २२ वर्षांपासून या अन्नछत्राचे आयोजन करण्यात येत आहे. गतवर्षी झालेली गर्दी लक्षात घेऊन या वर्षी २ लाखांहून अधिक यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील, या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण सिद्धता करण्यात आली आहे.

जोतिबा डोंगरावर चालू असलेली अन्नछत्राची सिद्धता

यात्रा काळात भाविक रात्री-अपरात्री डोंगरावर पोचतात, तरी कुणाचीही गैरसोय होऊ नये, म्हणून हे अन्नछत्र २४ घंटे चालू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सन्मति मिरजे, किरण शहा उपस्थित होते.

( सौजन्य : channel B)

प्रमोद पाटील पुढे म्हणाले,

‘‘यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग, तसेच अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक कार्यरत असतात. त्यांना पोटभर जेवण मिळावे, याकरता ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने भोजन देण्यात येते. गायमुखावर उभारण्यात येत असलेल्या या अन्नछत्रासाठी १५ सहस्र चौरस फुटांचा असा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचसमवेत चहासाठी वेगळा मंडप उभारण्यात आला आहे.’’