अमेरिकी नागरिकाच्या हत्येचा आरोप
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अंतरिम सरकारने बांगलादेशाच्या सैन्यातील बडतर्फ सैन्याधिकारी मेजर सय्यद झिया-उल-हक याची निर्दोष मुक्तता करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. तो जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाशी संबंधित असून तो अमेरिकेला हवा आहे. अमेरिकेने डिसेंबर २०२१ मध्येच त्याची आणि दुसरा आतंकवादी अक्रम याची माहिती देणार्यांसाठी ५० लाख डॉलरचे (४२ कोटी ९२ रुपयांचे) बक्षीस घोषित केलेले होते. हे दोघेही फेब्रुवारी २०१५ मध्ये ढाका येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात सहभागी असल्याचे आढळून आले होते. यामध्ये अमेरिकी नागरिक अविजित रॉय यांचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी रफिदा बोन्या अहमद घायाळ झाली होती.
बांगलादेशाकडून माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पारपत्र रहित
बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह ९७ जणांचे पारपत्र रहित केले आहेत. या सर्वांवर जुलै २०२४ मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी झालेल्या हत्यांमध्ये त्यांचा कथित सहभाग असल्याचा आरोप आहे. सरकारकडून सांगण्यात आले की, भारत सरकारला ठाऊक आहे की, शेख हसीना यांचे पारपत्र रहित करण्यात आले आहे आणि भारत सरकारने आधीच सांगितले आहे की, हसीना यांंना प्रवासी कागदपत्र देण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेश आता ‘आतंकवादी देश’ झाला आहे. त्याच्यापासून भारताचे रक्षण करण्यासाठी भारताला बचावात्मक नाही, तर आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक आहे ! |