मोरवणे, चिपळूण येथील सैनिक अजय ढगळे झाले हुतात्मा

रत्नागिरी – भारत-सीमेवर झालेल्या भूस्खलनात मोरवणे, चिपळूण येथील सुभेदार अजय शांताराम ढगळे हुतात्मा झाले आहेत. भारत-चीन सीमेवर रस्ता बनवण्यासाठी जागेची ‘रेकी’ करण्यासाठी सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते. त्याच वेळी सततचा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे २४ मार्च या दिवशी सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात सुभेदार अजय ढगळे आणि त्यांचे समवेत असलेले ५ सैनिक दरडीखाली गाडले गेले होते.
चिपळूणचा जवान अजय ढगळे सिक्कीममध्ये शहीद; भूस्खलनात बर्फाच्या ढिगाऱ्याखाली ४ जवान गाडले गेलेhttps://t.co/kZTo6B5Y8a #jawanmartyred #chiplun #sikkim #LANDSLIDE https://t.co/IDuQYt519C
— Maharashtra Times (@mataonline) April 1, 2023
या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय सेना दलाच्या सैनिकांनी प्राणाची बाजी लावून अजय ढगळे आणि अन्य ५ सैनिकांना शोधून काढले. अजय ढगळे पार्थिव ३ एप्रिल या दिवशी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.
अजय ढगळे यांचे पार्थिव १ एप्रिल या दिवशी संध्याकाळी ‘तवंग’ येथे आणण्यात आले असून २ एप्रिलच्या संध्याकाळी त्यांचे पार्थिव गुवाहाटीला आणले जाईल. त्यानंतर गुवाहाटीवरून ३ एप्रिलला विमानाने पुणे येथे पार्थिव आणण्यात येईल. त्यानंतर पुणे येथून रस्तेमार्गे मोरवणे येथे आणले जाईल.
मोरवणे येथे अजय यांचे आई-वडील असतात. त्यांची पत्नी आणि मुले मुंबईतील बोरिवली येथे वास्तव्यास आहेत.
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’