भालावली, राजापूर येथील युवतीवरील अत्याचाराचे प्रकरण

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील भालावली येथील अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत आणि वारंवार तिच्यावर अतिप्रसंग करणार्या नीलेश देवजी गुरव या ३३ वर्षीय तरुणाला रत्नागिरी जिल्हा पॉक्सो न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि २६ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Ratnagiri News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला 20 वर्षांचा सश्रम कारावास https://t.co/bRyMFJrFwG @moreamol555 #Ratnagiri #pocso #Jail
— ABP माझा (@abpmajhatv) April 1, 2023
१. मुलीवर अतिप्रसंग करण्याची घटना नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडली होती. या प्रकरणी राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचे अन्वेषण केले.
२. आरोपी नीलेश हा पीडितेच्या ओळखीतील होता. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून नीलेश तिच्या घरी गेला. या वेळी त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीने जानेवारी २०२१ मध्ये पुन्हा अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडित युवती गर्भवती राहिली. तिने याविषयी कुटुंबियांना सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
३. या प्रकरणाचे अन्वेषण करून पोलिसांकडून दोषारोप दाखल करण्यात आले. या प्रकरणी १५ साक्षीदार तपासले गेले.
४. सरकारच्या वतीने अधिवक्त्या (सौ.) मेघना नलावडे यांनी या वेळी युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली.
Lipstick Free Campus : केरळमध्ये ‘लिपस्टिक’मुक्त शाळा परिसर’ अभियानाला प्रारंभ !
Pakistan Sikh Murder : पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये घुसून शीख सेवादार दांपत्याची हत्या
भाजपची विचारसरणी सोडून अन्य पक्षात गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही ! – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
ISI Terrorist Arrested : आय.एस्.आय.शी संबंधित आतंकवादी गटातील आणखी ५ जणांना अटक
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
कृष्णा नदीपात्रात रासायनिक प्रदूषण नाही ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण