रामनाथी (फोंडा) – जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी तथा राष्ट्रसेविका समितीच्या राजस्थान आणि गुजरात राज्यांच्या कार्यवाहक सौ. राजश्री जानी, पतंजलि योग समितीचे गोवा अध्यक्ष श्री. कमलेश बांदेकर, सौ. गुळण्णवार, डॉ. जानी यांच्या विद्यार्थिनी वैद्या (सौ.) प्रतिभा दोशी आणि त्यांचे पती स्थापत्यविशारद श्री. सिद्धांत दोशी उपस्थित होते. सनातनच्या साधिका सौ. गौरी आफळे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन आदीची माहिती दिली. सर्वांनी कार्य जिज्ञासूपणे जाणून घेतले. आयुर्वेदाचार्य डॉ. जानी यांना आध्यात्मिक संशोधनाचे कार्य विशेष आवडले. ‘या कार्याचे लहान-लहान ‘व्हिडिओ’ बनवून प्रसारित केले पाहिजेत’, असे उद्गार त्यांनी काढले. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन त्यांना अभ्यासपूर्ण वाटले.
अभिप्राय१. आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी : व्यवस्थापन पाहून प्रभावित झालो. आश्रमातील वातावरण उत्तम आहे. आश्रमाची प्रस्तुती पुष्कळ चांगली आहे. येथील आध्यत्मिक संशोधन उद्देशपूर्ण आहे. अशा प्रकारचे संशोधन करण्याची माझी इच्छा झाली. २. सौ. राजश्री जानी : आश्रम अद्भुत आहे. सर्वत्र स्वच्छता आहे. ते पाहून साक्षात ईश्वराला भेटल्याची अनुभूती आली. संघटनात शक्ती आहे, हे इथे पहायला मिळाले. आपले कार्य ईश्वरीय कार्य आहे, याची अनुभूती आली. ३. वैद्या (सौ.) प्रतिभा दोशी : आश्रम पाहून एकच मनात आले – खूप छान ! ४. श्री. सिद्धांत दोशी : आश्रमाची व्यवस्था अतिशय नियोजनबद्ध आहे. येथे सुशिस्त आहे. साधक मनमिळावू आहेत. प्रबोधन आणि माहिती उत्तमरित्या व्यक्त केली जाते. |