अमेरिकेतील ५६ मोठ्या शहरांतील नागरिकांचे गावांकडे स्थलांतर !

अमेरिकेतील ५६ मोठ्या शहरांतील लोकांनी केली गावांकडे स्थलांतर करायला सुरुवात !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ५६ मोठ्या शहरांतील लोकसंख्या एकूण १० लाखांनी घटली आहे. येथील लोकांनी गावांकडे स्थलांतर करायला चालू केले आहे. अमेरिकेत जसे लोक महानगरे सोडून जात आहेत, तसेच चित्र सध्या युरोपातील स्विडन, ब्रिटन, फिनलंड, नॉर्वे इत्यादी देशांतही दिसू लागले आहे. याचा परिणाम अनेक घटनांवर झाला आहे. विशेष म्हणजे महसुलावर याचा परिणाम दिसून आला आहे.

लॉस एंजेलिस येथील लाँग बिच, शिकागो येथील नापेरव्हिले आणि एल्गिन, फिलाडेल्फिया येथील कॅमदेन आणि विलमिंग्टन यांसारख्या भागात गौरवर्णीय लोकांची संख्या अलीकडच्या काळात वाढली आहे, तर काही ठिकाणी कृष्णवर्णियांची वस्ती वाढू लागली आहे. ‘यामुळे अमेरिकी शहारांवरचा अतिरिक्त भार अल्प होईल’, असे सांगितले जात आहे. तसेच ‘शहरांतील महागाई अल्प होईल. अल्प उत्पन्न असलेले लोक आणि विद्यार्थी यांचे जगणे थोडे सुसह्य होईल’, असे तज्ञांकडून सांगितले जात आहे.