पुणे विभागात लोहमार्गावर वर्षभरात ४६४ जणांचा मृत्यू !

कमकुवत मनोबलामुळे आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आतातरी प्रशासनाने धर्मशिक्षण देऊन जनतेला सक्षम करावे, हीच अपेक्षा !

पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी २२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य ‘रोड शो’चे आयोजन !

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ २२ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते.

अमृतसरमध्ये सहस्रो सशस्त्र खलिस्तान समर्थकांकडून पोलीस ठाण्याला घेराव !

पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची वळवळ कशी वाढत आहे ?, हेच यावरून दिसून येते. ‘मागील इतिहास पहाता एखादी मोठी घटना घडल्यानंतरच सरकार जागे होणार आहे का ?’ असा प्रश्‍नही उपस्थित होतो !

‘जिहादी वधू’ शमीमा बेगम हिला नागरिकत्व देण्यास ब्रिटनचा नकार !

शमीमा ही सीरियातील निर्वासित छावणीमध्ये रहात आहे. तिने अनेकदा ब्रिटीश सरकारची क्षमा मागत ब्रिटीश नागरित्व देण्याची मागणी केली होती; मात्र ब्रिटीश सरकारने तिची मागणी वारंवार फेटाळली आहे. ब्रिटनकडून भारताने बोध घ्यावा !

अरुणाचल प्रदेशमध्ये नागा बंडखोरांच्या छावणीवर छापा : शस्त्रे हस्तगत

अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांनी नागा बंडखोरांच्या छावणीवर छापा घालून ती उद्ध्वस्त केली.

राजस्थानमधील भाजपच्या माजी आमदाराला २० वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या प्रकरणी १० वर्षांचा कारावास

एका गुन्ह्यावर निकाल देण्यास २० वर्षे लागत असतील, तर तो न्याय म्हणायचा का ?

पाकिस्तानमध्ये अल्पवयीने हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर !

पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !

काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्या नावाचा अवमान केल्यावरून आसाम पोलिसांनी काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना देहली विमानतळावरून अटक केली आहे. त्यांना देहली न्यायालयात उपस्थित केल्यानंतर आसामला नेण्यात येणार आहे.

‘अल्ला’ संस्कृत शब्द असून तो श्री दुर्गादेवीच्या आवाहनासाठी वापरला जातो ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

‘अल्ला’ हा शब्द मातृशक्तीचे प्रतीक आहे. तो संस्कृत शब्द आहे. श्री दुर्गादेवीच्या आवाहनासाठी ‘अल्ला’ शब्दाचा वापर केला जातो, असा दावा पुरीच्या पुर्वाम्नाय गोवर्धनपीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चिलानंद सरस्वती यांनी येथे केले.