पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !

होळी-रंगपंचमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीची ‘संस्कृती रक्षण’ मोहीम !

पुणे पाटबंधारे विभागाचे साहाय्यक अधीक्षक अभियंता श्री. रा.वि. सावंत यांना निवेदन देतांना समितीचे श्री. विनीत पाटील

पुणे, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी २२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन देण्यात आले. या वेळी खडकवासला जलाशय रक्षण मोहीमेच्या २० वर्षांच्या यशस्वीतेविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना अवगत केले. या वेळी समितीचे श्री. कृष्णाजी पाटील, श्री. विनीत पाटील उपस्थित होते.

खालील ठिकाणी निवेदने देण्यात आली.

१. पुणे जिल्ह्याचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्री. किरण सुरवसे यांना निवेदन देण्यात आले.

२. जिल्हाधिकारी कार्यालय पुणेचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्री. धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. ‘आमच्या कडूनही या मोहिमेसाठी लागणारे सर्व सहकार्य केले जाईल’, असे त्यांनी सांगितले.

३. खडकवासला पाटबंधारे विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेले निवेदन त्यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता श्री. रा.ए. उबाळे यांनी स्वीकारले.

४. पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आलेले निवेदन पुणे पाटबंधारे विभागाचे साहाय्यक अधीक्षक अभियंता श्री. रा.वि. सावंत यांनी स्वीकारले. ‘तुमचे कार्य पुष्कळच चांगले आहे, या विषयी मी लगेच खडकवासला विभागाला कळवतो’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

५. पुणे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्या कार्यालयात निवेदन दिले.

६. पोलीस उपायुक्त विशेष शाखा, पुणे यांच्या कार्यालयात निवेदन दिले.