पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य ‘रोड शो’चे आयोजन !

पिंपरी (पुणे) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ २२ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. हा ‘रोड शो’ उत्कर्ष चौक दत्तमंदिरपासून आरंभ झाला, तसेच केशवनगर, एम्.एम्. हायस्कूल काळेवाडीमार्गे जात शेवटी रहाटणी मावळ येथील ‘शिवेंद्र लाँस’ येथे जाहीर सभा घेण्यात आली. ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वागत करण्यात आले.

सौजन्य झी 24 तास