भिगवण (पुणे) – वनविभागाच्या भूमीवर मुरूम टाकल्यामुळे ‘तुझ्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो’, अशी बतावणी करून गुन्हा नोंद न करण्यासाठी वनरक्षकाने लाच मागितली होती. या प्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून उल्हास मोरे या वनरक्षकावर गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार रहात असलेल्या घरासाठी पूर्वीपासूनच वनविभागाच्या जागेतून जाणारा रस्ता वापरत होते. नजीकच्या काळात अतीवृष्टी झाल्यामुळे या रस्त्यावर खड्डे आणि चिखल झाल्याने तक्रारदाराने स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकला. या प्रकरणी मोरे याने १० सहस्र रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी मोरे यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांना धाक बसणार नाही ! |