संघाचे मंचर (पुणे) येथील शस्त्रपूजन आणि सघोष पथसंचलन !
मंचर (जिल्हा पुणे) – आगामी काळात संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघशताब्दीच्या निमित्ताने संघकार्याचा विस्तार हा सर्वस्पर्शी-सर्वसमावेशक होणे अपेक्षित आहे. संपूर्ण समाज समरस व्हावा, भारत देश विश्वगुरुपदी विराजमान व्हावा, यासाठीच हिंदु समाजाचे संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अविरतपणे करत आहे, असे प्रतिपादन जिल्हा सहकार्यवाह अभिजित शिंदे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रतिवर्षीप्रमाणे शस्त्रपूजन आणि सघोष पथसंचलन मंचर (ता. आंबेगाव) येथे पार पडले. कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा संघचालक डॉ. भास्करराव भोसले, प्रमुख पाहुणे ह.भ.प. नामदेव महाराज वाळके, तालुका संघचालक संजय बाजारे, ज्येष्ठ नेते कैलास राजगुरव आदी मान्यवर उपस्थित होते.