पुणे – तस्करी करून आणलेले ४ कोटी ४७ लाख रुपयांचे ६ किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डी.आर्.आय.) पथकाने तळेगाव पथकर नाका परिसरात जप्त केले आहे. मुंबईहून पुण्यात बसने तस्करी करून आणलेले सोने पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘डी.आर्.आय.’च्या पथकाने ही कारवाई केली आहे. औषधी कॅप्सुलमध्ये सोन्याची भुकटी भरल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी ४ जणांना मुंबई आणि पुणे येथून अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.