देहली महानगरपालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये हाणामारी !

संसद आणि राज्यांच्या विधानसभांबरोबर अशा घटनांचे लोण महानगरपालिकांत पोचले असून उद्या हे ग्रामपंचायतींमध्येही पोचण्याची शक्यता आहे. यातून देशातील लोकशाहीची चिंताजनक स्थिति स्पष्ट होते !

लाहोर (पाकिस्तान) येथील महाभारतकालीन ‘पंजतीर्थ’ हे हिंदु तीर्थक्षेत्र मुसलमानांच्या कह्यात !

भारतात हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्याचे काम चालू आहे, तर पाकमध्ये मंदिरांचा गोदामे म्हणून वापर होत आहे ! हिंदूंच्या मंदिरांची देश-विदेशांत होणारी ही विटंबना रोखण्यासाठी सरकार पावले उचलणार का ?

यशवंतगडानजीकचे अवैध उत्खनन आणि बांधकाम यांच्या विरोधातील उपोषण ३ र्‍या दिवशीही चालूच !

शिवरायांची जयंती साजरी करतांना गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व विसरणे, प्रशासनाला लज्जास्पद ! गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शिवप्रेमींना सलग ३ र्‍या दिवशीही आंदोलन चालू ठेवावे लागणेही, प्रशासनाला लज्जास्पद !

मातीचा भराव टाकणे आणि अनधिकृत बांधकामे यांविरोधात गोवा शासनाची मोहीम

परिपत्रकात पुढे म्हटले आहे की अनधिकृत बांधकाम केलेले आढळल्यास कायद्यानुसार अनधिकृत बांधकाम त्वरित तोडून तेथील स्थिती पूर्ववत करावी.

आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्री केंद्र कायमस्वरूपी बंद झाल्याविषयी सुस्पष्टता नाही

मद्यविक्री केंद्र चालवणार्‍या मालकाच्या मते करारानुसार संग्रहालयातील स्वागतकक्षात खाद्य आणि पेय यांचे प्रदर्शन अन् विक्री करता येते.

गडकोट जतन करून त्‍यांना पुनर्वैभव प्राप्‍त करून देणे, हेच आमचे एकमेव ध्‍येय आहे ! – रवींद्र पडवळ, समस्‍त हिंदु बांधव, संस्‍थापक अध्‍यक्ष

छत्रपती शिवरायांच्‍या गडकोटांचे रक्षण हे आत्‍मसन्‍मान आणि पर्यायाने आत्‍मरक्षण यांसाठी अत्‍यावश्‍यक !

राष्‍ट्रपती राजवट कुणाच्‍या सांगण्‍यावरून लागली ? हेही शरद पवार यांनी स्‍पष्‍ट करावे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये ‘अजित पवार यांच्‍या समवेत घेण्‍यात आलेल्‍या शपथविधीविषयी शरद पवार यांना माहिती होती’, असा गौप्‍यस्‍फोट केला होता.

स्वतंत्र भारतातील आतापर्यंतचे शासनकर्ते यावर विचार करतील का ?

‘कुठे भारतात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत केवळ ७५ वर्षेही राज्य करू न शकणारे भारतातीलच आतापर्यंतचे शासनकर्ते, तर कुठे विदेशातून थोड्याशा सैन्यासह भारतात येऊन कोट्यवधी हिंदूंवर शेकडो वर्षे राज्य करणारे मुसलमान, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या एका नामफलकाची दुरवस्‍था, तर दुसरा फलकच गायब !

कोल्‍हापूर शहरात सरस्‍वती चित्रमंदिराशेजारी असलेल्‍या स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या नामफलकाची दुरवस्‍था झाली आहे, तसेच हा फलक अतिक्रमणाच्‍या गर्तेत सापडला आहे.

अंगणवाडी सेविकांच्‍या संपामुळे बालके पोषण आहारापासून वंचित !

बालकांच्‍या आरोग्‍याशी खेळण्‍यापेक्षा वैध मार्गाने आपल्‍या मागण्‍या मान्‍य करण्‍यासाठी प्रयत्न करावेत !