अरुणाचल प्रदेशमध्ये नागा बंडखोरांच्या छावणीवर छापा : शस्त्रे हस्तगत

ईटानगर (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांनी नागा बंडखोरांच्या छावणीवर छापा घालून ती उद्ध्वस्त केली. भारत-म्यानमार सीमेजवळील चांगलांग जिल्ह्यातील ‘ईस्टर्न नागा नॅशनल गव्हर्नमेंट’च्या या छावणीतून पोलिसांनी शस्त्रे हस्तगत केली आहेत.