पाकिस्तानमध्ये अल्पवयीने हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील मीरपूर खास जिल्ह्यातील नौकोट येथे एका १७ वर्षीय हिंदु मुलीचे मुसलमानांकडून अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही मुलगी १५ फेब्रुवारीला तिच्या लहान भावासह बाजारात भाजी विकत घेण्यासाठी गेली असता उमरकोट येथील रौफ आणि त्याचे मित्र यांनी तिचे अपहरण केले. मुलीचे वडील रमेश भील यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना सांगितले की, मुलगी स्वेच्छेने गेली आहे. त्यामुळे अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यासाठी एक आठवडा थांबावे लागेल.

याविषयी नौकोट पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने सांगितले की, मुलीने इस्लाम स्वीकारला असून तिला रौफ समवेत रहायचे आहे.

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !