कोल्हापूर – भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी ‘हलाल उत्पादने’ प्रत्येकाच्या घरात पोचली आहेत. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना हलाल प्रमाणपत्र देत आहे. अनेक हिंदु व्यापार्यांना त्यांच्या उत्पादनांची निर्यात करण्यासाठी हे प्रमाणपत्र घेण्यास भाग पाडले जात आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना अतिरेक्यांना न्यायालयीन साहाय्य करत आहे. त्यामुळे दीपावलीच्या निमित्ताने हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानाच्या अंतर्गत हॉटेल रणजीत येथे उद्योजक, व्यावसायिक यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. हा विषय ऐकल्यावर काही व्यावसायिकांनी ‘हलाल जिहाद’विषयी प्रबोधन करणारे होर्डिंग्ज प्रायोजित करणे, हस्तपत्रके वितरण करणे, मॉलमध्ये निवेदन देणे अशा कृती करण्याची सिद्धता दर्शवली.
संपादकीय भुमिकाहिंदूंनो, हलालच्या उत्पादनांवर बहिष्कार घालून ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा ! |