संभाजीनगर येथे गणपति मंदिराची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड !

समाजकंटकांना भय नसल्‍यामुळेच मंदिरांंची तोडफोड आणि मंदिरांतील दानपेट्यांच्‍या चोर्‍या होतात, असेच सर्वसामान्‍यांना वाटते. पोलिसांनी लवकरात लवकर अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी !

आधुनिक वैद्यांवरील आक्रमणांत १३ वर्षांत केवळ दोघांनाच शिक्षा !

मागील दीड मासात आधुनिक वैद्यांवर जीवघेणे आक्रमण झाल्‍याच्‍या ५-६ घटना घडल्‍या आहेत. यामुळे आधुनिक वैद्यांमध्‍ये भीतीचे वातावरण असून कायद्यातील पळवाटांचा समाजविघातक लोकांना लाभ पोचत आहे, अशी खंत ‘आय.एम्.ए.’चे राज्‍य अध्‍यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांंनी व्‍यक्‍त केली.

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ गीताला महाराष्‍ट्राच्‍या राज्‍यगीताचा दर्जा !

‘जय जय महाराष्‍ट्र माझा, गर्जा महाराष्‍ट्र माझा’ या गीताला महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यगीताचा दर्जा दिला आहे. १९ फेब्रुवारीपासून ‘राज्‍यगीत’ म्‍हणून या गीताचा स्‍वीकार करण्‍यात येणार आहे.

‘अंनिस’ने दिलेले चमत्‍काराचे आवाहन मी स्‍वीकारतो ! – अतुल छाजेड, ज्‍योतिषाचार्य

अंनिसला चपराक ! अंनिसला याविषयी काय म्‍हणायचे आहे ?

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनातील भव्‍यता ‘न भूतो न भविष्‍यति’ ठरणारी  !

७ सहस्र ५०० आसंद्यांची व्‍यवस्‍था असणारे असे ५ सभामंडप सिद्ध !

श्रद्धास्‍थानांवर आक्रमण केल्‍यास धर्मरक्षणासाठी ‘जशास तसे’ उत्तर देऊ !

जामनेर तालुक्‍यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदु गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्‍या कुंभाचा समारोप ३० जानेवारी या दिवशी झाला. त्‍या वेळी ते बोलत होते.

विद्यार्थ्‍यांना निकृष्‍ट दर्जाचा शालेय पोषण आहार पुरवठा करणार्‍यांवर कारवाई करा !

२७ जानेवारीला ‘वान्‍लेसवाडी हायस्‍कूल सांगली’ येथील ३४ विद्यार्थ्‍यांना निकृष्‍ट दर्जाच्‍या पोषण आहारामधून विषबाधा झाली. यामुळे विद्यार्थ्‍यांना जुलाब, उलटी आणि अन्‍य त्रास झाले.

संतांविषयी कुणी चुकीचे बोलू नये, यासाठी कायदा करा – देहू संस्‍थानचे विश्‍वस्‍त माणिक महाराज मोरे यांची मागणी

सध्‍या कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, संस्‍कृती, संत, परंपरा यांच्‍यावर वाटेल ते बोलतो. हिंदु संघटित नसल्‍यामुळेच असे होत आहे. सर्वत्रच्‍या हिंदूंनी संघटित होऊन आपली ताकद दाखवल्‍यास कुणाचेही असे वक्‍तव्‍य करण्‍याचे धाडस होणार नाही.

एम्.पी.एस्.सी. परीक्षा पद्धतीतील पालट वर्ष २०२५ पासून लागू होतील ! – राज्‍यशासनाचा निर्णय

येथील अलका चौकातील विद्यार्थ्‍यांच्‍या अराजकीय ‘साष्‍टांग दंडवत्’ या आंदोलनाला यश मिळाले आहे. ‘तलाठी’ या पदाचीही भरती एम्.पी.एस्.सी. परीक्षेद्वारेच करावी, अशीही मागणी या वेळी करण्‍यात आली आहे.