आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू ! – पुतिन

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण चालू केले होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण ४७१ किलोमीटर रस्त्यांपैकी २७७ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे सर्व बांधकाम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ७ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाच्या विरोधातील युक्रेनच्या याचिकेवर सुनावणी

युक्रेनने रशियावर नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. न्यायालय या प्रकरणी चौकशी करून यावर निर्णय देणार आहे.

अधिग्रहीत भूमीचा मोबदला मूळ मालकाला मिळण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

शासनाकडून अधिग्रहीत करण्यात येणार्‍या भूमीच्या मोबदल्यातील ५० टक्के रक्कम मूळ मालकाला मिळावी, यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. या विधीमंडळाच्या अधिवेशनात सुधारणा करून हा कायदा आणू, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ७ मार्च या दिवशी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन मास पुढे ढकलल्या ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी घातलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी ३ मास लागणार आहेत. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म अन् मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आपण कितीही श्रीमंत असलो, तरी प्रत्येकाने मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ६ मार्च या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या २ शहरांतील पिंपरी ते फुगेवाडी अन् गरवारे स्थानक ते आनंदनगर या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एम्.आय.टी. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेच्या वेळी ते बोलत होते.

धर्मांध आर्किटेक्टने ‘देवेश’ बनून हिंदु मुलीशी लग्न केले आणि ७ वर्षे घरात डांबून केले अत्याचार !

उच्च शिक्षित असल्याने धर्मांधांची जिहादी मानसिकता पालटत नाही, हे लक्षात घेऊन हिंदु मुलींनी धर्मांध मुलांपासून सावध रहा आवश्यक आहे !

आयुर्वेदातील वेदरूपी आध्यात्मिक प्रकाश प्रकट करण्यासाठी नियमित साधना केली पाहिजे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आज अमेरिकेसारखा देश आयुर्वेदातील गुप्त दिव्य ज्ञानाचा वापर करून आपल्या देशातील आजार बरे करत आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनीही आयुर्वेदाचे ज्ञान समजून घेऊन त्याचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे.

होळीविषयी आक्षेपार्ह वाक्य असल्याने ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाला सामाजिक माध्यमांतून विरोध !

‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. त्यात ‘होली पे गोली’ (होळीच्या दिवशी गोळी) असे वाक्य पडद्यावर दिसते. हे वाक्य हिंदूंच्या सणांविषयीचे आक्षेपार्ह वाक्य असल्याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे