मथुरा (उत्तरप्रदेश) – आज अमेरिकेसारखा देश आयुर्वेदातील गुप्त दिव्य ज्ञानाचा वापर करून आपल्या देशातील आजार बरे करत आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनीही आयुर्वेदाचे ज्ञान समजून घेऊन त्याचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. आयुर्वेदाने मुळापासून आजार नष्ट होतात; परंतु यात विद्यमान असलेला वेदरूपी आध्यात्मिक प्रकाश आपल्या अंतर्मनातील जन्मोजन्मीचे संस्कार नष्ट झाल्यावरच प्रकट होतो. त्यासाठी साधनेचे नियमित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते चोमा, मथुरा येथील एस्.के.एस्. आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बृजबिहारी मिश्रा होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस्. पराशर यांचे साहाय्य लाभले. या कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतला.
विशेष
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्राध्यापकांनी ‘सध्याच्या स्थितीत आयुर्वेदाचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून कसा लाभ करून घेऊ शकतो ?’ याविषयी सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याशी चर्चा केली.