मुंबई – साजिद नाडियावाला निर्मित आणि फर्हद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपटातील काही प्रसंगांचे काही क्षणांचे विज्ञापन) प्रसिद्ध झाला आहे. त्यात ‘होली पे गोली’ (होळीच्या दिवशी गोळी) असे वाक्य पडद्यावर दिसते. हे चित्रपटाचे घोषवाक्य (टॅग लाईन) म्हणून पुढे येते. हे वाक्य हिंदूंच्या सणांविषयीचे आक्षेपार्ह वाक्य असल्याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. या वाक्यामुळे हिंसेचा पुरस्कार करणार्या या चित्रपटातून हिंदूंच्या सणाविषयी अपसमज निर्माण होऊ शकतो. अक्षयकुमार यांनी या चित्रपटात काम केले आहे. १८ मार्च या दिवशी हा चित्रपट प्रसारित होणार आहे.
१. एकाने चित्रपटाला विरोध करतांना म्हटले आहे, ‘‘होळीच्या दिवशी गोळी’ याचा अर्थ काय होतो. होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. हिंसा आणि गुंडगिरी करण्याचा नाही. हिंदु सणांची थट्टा करणे बंद करा. बकरी ईदला ‘ईदपे कतलेआम’ (‘ईदला हत्याकांड’) अशा प्रकारे लिहिले जाते का ?’’
२. दयानंद बैरागी यांनी विरोध करतांना म्हटले आहे, ‘‘हिंदी चित्रपटसृष्टी हिंदूंच्या सणांची थट्टा करण्यात काही कमी सोडत नाहीत. या चित्रपटाचे घोषवाक्य ‘होली पे फ्लॉप होगी’ अशी हवी.’’
३. मोहित अरोडा यांनी म्हटले आहे, ‘‘हिंदु संस्कृती, सभ्यता आणि सण यांवरून हिंदूंना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे. होळी रंगांचा सण, क्षमा करण्याचा सण, शांती आणणारा सण आहे; पण साजिद नाडियावाला या होळीला ‘गोळी’ घेऊन आले आहेत. अक्षयकुमार तुम्हाला लाज वाटली पाहिजे.’’