मुसलमान युवतीशी प्रेम केल्यावरून हिंदु ट्रकचालकाची करण्यात आली हत्या !

हिंदु युवतीशी प्रेम केल्यामुळे धर्मांधाची हत्या झाली असती, तर सर्व पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि वृत्तवाहिन्या यांनी हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवले असते; पण या घटनेतील आरोपी धर्मांध असल्यामुळे ते सर्व आता गप्प आहेत, हे जाणा !

जीवनातील दु:ख न्यून करण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास करून ते आचरणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे बालाजी महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात मार्गदर्शन करत होते.

केरळ येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेले ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप यांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘महाशिवरात्रीचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित करण्यात आले होते. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले होते.

जत (जिल्हा सांगली) तालुक्यात खाद्यपदार्थांची विनाअनुमती सर्रास विक्री  निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरून भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष ! – काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खाद्यपदार्थांची विनाअनुमती सर्रास विक्री होत असून निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरून भेसळयुक्त पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ विक्री केली जात असल्याचे जानेवारी २०२२ मध्ये निदर्शनास आले आहे.

‘म्हाडा’ परीक्षा घोटाळा प्रकरणातील जी.ए. सॉफ्टवेअर आस्थापन कायमस्वरूपी काळ्या सूचीत !

पदभरतीतील निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अपकीर्ती प्रकरणी जी.ए. सॉफ्टवेअरसह तिच्या संचालकांना महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाकले आहे.

क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ सिद्ध होऊया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

आज महिलांवरील अत्याचार हिंदु युवकांच्या हत्या होत आहेत. याचा सामना करण्यासाठी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र-धर्मरक्षणार्थ सिद्ध होऊया.

रुग्णसंख्येनुसार मनुष्यबळ पुरवण्यावर भर ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री

कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन अकोला येथील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मनुष्यबळाची जशी आवश्यकता लागेल, त्याप्रमाणे मनुष्यबळ पुरवण्यावर भर दिला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यावर उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण करणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

जानेवारी २०२२ मध्ये ९२ माता, तर १ सहस्र १६६ अर्भक यांचा मृत्यू !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही राज्यात अर्भक आणि माता यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असणे लज्जास्पद आहे !

अमरावती येथील आमदार रवि राणा यांचा अटकपूर्व जामीन संमत !

येथील महापालिकेच्या आयुक्तांवर शाई फेकल्याच्या प्रकरणी  ५ मार्च या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार रवि राणा यांना सशर्त जामीन संमत केला आहे.