प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा आदेश !

मुंबई बँकेचे बोगस कर्ज वाटप प्रकरण

मुंबई – मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहेत.

बोगस दस्ताऐवजांच्या आधारे २७ कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे आदेश सहकार विभागाने दिले.

धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्जवाटप करण्यात आले होते. त्यासाठी बोगस दस्ताऐवज सिद्ध करण्यात आले होते. मुंबई बँकेने या कर्जप्रकरणात मोठी पुष्कळ अनियमितता केली आहे.