१. ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याचे प्रत्यक्ष दर्शन रामनाथी आश्रमात होते.’ – श्री. मानव बुद्धदेव, सचिव आणि मिडिया प्रभारी, योग वेदांत सेवा समिती, अमरावती तथा सचिव, पर्यावरण समिती, लोहाणा महापरिषद, विदर्भ, महाराष्ट्र. (४.६.२०१९)
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
२. सूक्ष्मातील वाईट शक्तींचा प्रादुर्भाव बघून मला प्रथम भीती वाटली. नंतर माझ्या मनात लगेच विचार आला, ‘साधना एकमेव अशी गोष्ट आहे, जी साधकांचे रक्षण करते.’
– श्री. हर्षल कि. देसाई, धुळे, महाराष्ट्र.
३. ज्यामध्ये सात्त्विक गुण असतात, त्यांना दुष्ट शक्तींचा त्रास होतो; पण गुरुकृपेने त्यांचा प्रभाव न्यून होऊ शकतो. सूक्ष्म जगतामध्ये जशा वाईट गोष्टी असतात, तशा दैवी गोष्टींचासुद्धा अनुभव आलेला दिसून येतो.’
– श्री. हनुमंत साहेबराव जाधव, गोरक्षक, समस्त हिंदू आघाडी, पुणे, महाराष्ट्र. (४.६.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |