भीलवाडा (राजस्थान) – जिल्ह्यातील रूपपुरा येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील निर्मला कामड या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना ‘हिंदुइज्म : धर्म या कलंक ?’ हे पुस्तक वितरित केले. या प्रकरणी पालकांनी केलेल्या विरोधानंतर जिल्हा शिक्षण अधिकार्यांनी चौकशीचा आदेश दिला होता. आता या शिक्षकेला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने जामीन देण्यास नकार देत तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. कामड यांच्यावर कलम २९५ (एखाद्या धर्माचा अवमान करणे) आणि भा.दं.वि. ५०५ (धर्म किंवा समाज यांच्या विरोधात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसारित करणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
स्कूल में धर्म विरोधी किताब बांटने वाली महिला टीचर भेजी गईं जेल#Rajasthan #Crime https://t.co/SRSC5WAJO5
— Times Now Navbharat (@TNNavbharat) March 6, 2022