उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत दोन्ही बाजूंच्या किमान २ प्रतिनिधींना बोलवणे आवश्यक ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची शिष्टमंडळे काल आणि आज मला भेटण्यास आले होते. या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

राज्यातील कारागृहांच्या जागेवरील अतिक्रमणे हटवणार ! – सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक

कोल्हापुरात कळंबा कारागृहाच्या परिसरातही अशाच प्रकारे अतिक्रमण उभारले आहे. तरी राज्यातील सर्व कारागृहांच्या शासकीय जागांचे मोजमाप करून त्या ठिकाणी संरक्षित कठडे उभे केले जातील.

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे, तर अडले कुठे ? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसमध्ये २ गट पडले आहेत ! – काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर जोरदार टीका करतांनाच त्यांनी अनेकदा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही सडकून टीका केली आहे.

सरकारी निधीअभावी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे काम रखडले

आतंकवादी अजमल कसाब याला जिवंत पकडतांना हौतात्म्य स्वीकारणार्‍या तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम भारतियांच्या हृदयात ठसून राहिला आहे.

दळणवळण बंदी हटवण्याविषयी पाचगणी (जिल्हा सातारा) येथील व्यापार्‍यांचे आंदोलन

जिल्ह्यातील दळणवळण बंदी हटवण्यात यावी, अशी मागणी सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर पाठोपाठ आता पाचगणी येथील व्यापार्‍यांनीही केली आहे.

‘नाबार्ड’कडून सातारा जिल्हा बँकेला ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (‘नाबार्ड’) यांच्याकडून प्रतिवर्षी उत्कृष्ट कार्यक्षमतेविषयीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ बँक पुरस्कार दिला जातो. तो या वर्षी सातारा जिल्हा बँकेला प्रदान करण्यात आला आहे.

विटा (जिल्हा सांगली) येथे अटल भूजल योजना चित्ररथाचा शुभारंभ !

गावांमध्ये जलपरिपूर्णतेसाठी लोकसहभागातून ठोस व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत.

दुर्बल घटकांना साहाय्य म्हणून कर्नाटक शासनाकडून गायीच्या वासरांचे अल्प दरात वाटप !

दुर्बल घटकांना आर्थिक साहाय्य म्हणून उत्कृष्ट वंशाच्या गायींची वासरे ‘अमृत सिरी’ या योजनेअंतर्गत अल्प दरात देण्यात येतील

यवतमाळ येथे धर्मांध जमावाकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

सर्वत्र आणि सातत्याने दिसणारा धर्मांधांचा उद्दामपणा पोलीस कायमचा कधी मोडून काढणार ?