आसाम शासनाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या पत्नीला अडीच लाख रुपयांचे साहाय्य !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा धनादेशांचे वितरण करताना

गौहत्ती (आसाम) – आसाम शासनाने राज्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पत्नीला एकरकमी २ लाख ५० सहस्र रुपये साहाय्य देण्याची योजना चालू केली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांच्या आतील आहे, अशाच कुटुंबांना हे साहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी अशा १७६ विधवांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे साहाय्य देऊन या योजनेला प्रारंभ केला. राज्यातील ८७३ विधवांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, असे एका पहाणीत आढळून आले आहे. या सर्वांना पुढील आठवड्यापर्यंत धनादेश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.