सिंहगड, खडकवासला (पुणे) येथे येणार्‍या पर्यटकांकडून ८८ सहस्र रुपयांचा दंड वसूल !

पर्यटकांवर कारवाई करताना पोलीस

पुणे – हवेली पोलिसांनी सिंहगड आणि खडकवासला परिसरात येणार्‍या १७७ पर्यटकांवर कारवाई करून ८८ सहस्र ५०० रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांनी या परिसरात फिरणार्‍या पर्यटकांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यटन स्थळांवर नियम मोडून कुणीही फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन हवेली पोलीस वेळोवेळी करत होते; मात्र तरीही पर्यटक येत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. दंडात्मक कारवाई बरोबरच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याने कुणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.