महाकवी कालिदास यांच्या ऋतुसंहार या संस्कृत काव्याच्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. सदानंद मोरे

पुणे – मानव संस्कृतीने निसर्ग प्रकृतीशी इतर नैसर्गिक घटकांप्रमाणे जुळवून न घेता उलट त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला, तर मानवजात संकटात येईल, असे मत राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी ९ जुलै या दिवशी व्यक्त केले. महाकवी कालिदास रचित ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा ऋतुसंहार…एक रसानुवाद या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सिग्नेट पब्लिकेशनच्या वतीने महाकवी कालिदासदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ. ज्योती रहाळकर यांनी हा अनुवाद केला आहे.