संघाच्या या शाखांद्वारे मुसलमानांमध्ये अधिकाधिक राष्ट्रप्रेम निर्माण होऊन ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा !
चित्रकूट (उत्तरप्रदेश) – येथे ५ दिवसांपासून चालू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीची सांगता झाली. यात काही निर्णय घेण्यात आले. केवळ हिंदूच नाही, तर मुसलमानांनाही संघाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार देशातील मुसलमानबहुल भागामध्ये शाखा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या कालावधीत बंद पडलेल्या कार्यक्रमांसमवेतच शाखाही पुन्हा चालू करण्यात येणार आहे.
संघ आता मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये सुरु करणार शाखा ; RSS चा मोठा निर्णय https://t.co/nmSkElFYW7 < येथे वाचा सविस्तर वृत्त #India #RSS #Muslim @RSSorg pic.twitter.com/J8cRBG9iBv
— LoksattaLive (@LoksattaLive) July 13, 2021