आषाढी यात्रेनिमित्त यंदाही विठुरायाचे ‘ऑनलाईन’ दर्शन

मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अखिल भारतीय महासंघ, ‘ इन्फोसिसच्या स्पर्श फाऊंडेशन’ यांच्या वतीने गरजूंना अन्नधान्य साहित्य वाटप !

सौ. मोनिका करंदीकर आणि श्री. अतुल शहा यांच्या विशेष प्रयत्नांतून कलाकारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या पंचायतराजमधील आरक्षणावर गदा ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

राज्यातील प्रत्येक घटक सरकारवर नाराज आहे. याचे मूल्य सरकारला चुकवावे लागणार आहे.

शिराळा तालुक्यातील भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प केला आहे.

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निधीतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान !

आमदार फंडातून २ रुग्णवाहिका खरेदी केल्या असून त्यातील एक महानगरपालिकेच्या कुपवाड विभागास दिली आहे, तर दुसरी शासकीय रुग्णालयास प्रदान करण्यात आली.

साम्यवादामुळे झालेली हिंदूंची केविलवाणी अवस्था !

‘मुसलमान साम्यवादी होत नाहीत, तर देवाला न मानणारे हिंदू साम्यवादी होतात. त्यामुळे त्यांना देवाचा आशीर्वाद मिळत नाही. साम्यवादी झालेले हिंदू बंगाल आणि केरळ येथे अधिक प्रमाणात असल्याने तेथील हिंदूंची अवस्था केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

कोटी कोटी प्रणाम !

संत मुक्ताबाई तिरोभूतदिन (पुण्यतिथी)
पुणे येथील सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचा आज वाढदिवस !
चेन्नई येथील सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांचा आज वाढदिवस !

प्रसारमाध्यमांच्या गुलामी मानसिकतेने घातलेला सेक्युलरवादाचा बुरखा हटवणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन विशेष परिसंवादांतर्गत ‘सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुविरोधी पत्रकारिता !’, या विषयावर विशेष परिसंवाद

‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ प्राप्तकर्ते पहिले भारतीय शिक्षक डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती !

जगभरातील १२ व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बार्शी येथील डिसलेगुरुजी यांचा समावेश आहे.

भारतात धर्मांतरबंदी कायदा करून सर्वांसाठी समान न्याय लागू करावा ! – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय

धर्मांतर होऊ नये, यासाठी देशातील थोर पुरुषांनी बलीदान दिले आहे, असे असतांना पंजाबमधील जालंधर येथे सर्वांत मोठे चर्च बांधले जात आहे, ही चिंतेची गोष्ट आहे.