मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १७ जून या दिवशी सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकली. त्यानंतर दुपारी त्यांना अटक करण्यात आली.

कल्याण येथील श्री हनुमानाच्या मंदिरातील पितळी मूर्तींची चोरी करणारे धर्मांध अटकेत !

कोळसेवाडी पोलीस परिसरात गस्त घालत असतांना त्यांनी संशयास्पद हालचाली करणारे इरफान खान आणि फैझल खान यांना हटकले. त्या वेळी त्यांच्याकडे पितळी मूर्ती आणि भांडी आढळून आली.

आसाममध्ये वर्ष २०३८ पर्यंत मुसलमान बहुसंख्यांक होतील !

या दशकात हिंदूंच्या तुलनेत मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीचा वेग दुप्पट होता.

भारतातल्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ३० लाख कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता ! – बँक ऑफ अमेरिका

‘नॅसकॉम’च्या मते देशांतर्गत आयटी क्षेत्रात जवळपास १ कोटी ६० लाख लोक काम करतात.

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा २० जुलैला, तर १२ वीचा ३१ जुलैला निकाल !

बोर्डाने १७ जून या दिवशी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला. ४०:३०:३० या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. यामध्ये ३ प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती !

नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सचे मूल्य ७ पटींहून अधिक वाढले.

‘सहकारी बँकिंग कायद्या’च्या विरोधात नागरी सहकारी बँक असोसिएशन उच्च न्यायालयात जाणार

केंद्र सरकारच्या ‘सहकारी बँकिंग कायद्या’तील दुरुस्तीमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावर विपरित परिणाम होणार असल्याचा दावा करत राज्यातील ‘नागरी सहकारी बँक असोसिएशन’ने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी भाजपचा विरोध करण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा दिला होता प्रस्ताव !

अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांचा दावा !

हवामान पालटामुळे होणारी हानी सुधारता येणार नाही ! – वैज्ञानिकांचा दावा

प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.

बलात्कार आणि हत्या यांच्या प्रकरणातील अटकेतील धर्मांधाचे पोलिसांवर आक्रमण करून पळण्याचा प्रयत्न

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धर्मांध घायाळ