गोव्यात कोरोनामुळे दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू, तर ४२३ नवीन कोरोनाबाधित

गोव्यात ११ जून या दिवशी कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. दुसर्‍या लाटेत पहिल्यांदाच ही संख्या एकेरीत आली आहे. एकूण मृतांची सख्या २ सहस्र ८९९ झाली आहे.

म्हापसा येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थान समितीकडून गरजूंना कडधान्य आणि भाजीचे घरपोच वितरण

देवस्थान समित्या महामारीच्या काळात गरजूंना साहाय्य करतात, तशा अन्य धर्मियांच्या संस्था करतात का ? काही ख्रिस्ती गरीब आणि आदिवासी यांना साहाय्य करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर मात्र करतात, हे लक्षात घ्या !

महसूल अधिकार्‍यांच्या शासकीय कामात अडथळा आणणार्‍या वाळू तस्कराला अटक !

अवैध गौण खनिज उत्खनन आणि चोरी यांवर महसूल विभागाच्या पथकाची कारेगावात (ता. शिरूर) येथे कारवाई चालू होती. आरोपी धीरज पाचर्णे हा शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे.

छपरा (बिहार) येथे २ वर्षांपूर्वी चोरी झालेल्या कोट्यवधी मूल्याच्या २ मूर्ती अज्ञातांनी केल्या परत !

वर्ष २०१२ मध्ये चोरट्यांनी तत्कालीन पुजार्‍याला बांधून मंदिरातील ३ मूर्ती चोरून नेल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये पुन्हा या मंदिरातून ३ मूर्ती चोरी झाल्या होत्या. त्यातील २ आता परत करण्यात आल्या आहेत.

‘ओबीसी’ आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ! – पंकजा मुंडे, सरचिटणीस, भाजप

‘ओबीसी’ आरक्षणाविषयी राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे’, असा आरोप भाजपच्या सरचिटणीस श्रीमती पंकजा मुंडे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापुरात शनिवार, रविवार कडक दळणवळण बंदी !

यात वृत्तपत्र मुद्रण, विक्री, रुग्णालये, औषधे विक्री, निर्मिती, शेतीची कामे, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बस), माल वाहतूक, बसेस, लांब पल्ल्याचा रेल्वेचा प्रवास चालू रहाणार आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापार अन् उद्योग व्यवसाय पूर्ववत् चालू करा ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ११ जून या दिवशी दिले.

पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भूजल पुनर्भरण आवश्यक ! – मल्लीनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणा

‘पाऊस पाणी संकलन आणि भूजल प्रदूषण’, या विषयावरील ‘वेबिनार’मध्ये ते बोलत होते.

शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करा ! – डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, कोल्हापूर महापालिका

पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

बांका (बिहार) येथील स्फोट देशी बॉम्बचाच असल्याचे उघड !

हा बॉम्ब तेथेच एका कंटेनरमध्ये ठेवला होता. तो फुटल्यानंतर मौलाना अब्दुल मोबीन यांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती आता समोर आली आहे. हा मदरसा अनधिकृत होता, असेही उघड झाले आहे.