पन्हाळगड ते विशाळगड पावनखिंड मोहीम स्थगित करून रक्तदान शिबिरांचे आयोजन ! – कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशन

१२ आणि १३ जुलै या दिवशी पावनखिंड संग्रामावर आधारीत ‘फेसबूक लाईव्ह’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सर्व संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे.

कोरोना रुग्णांनी वाढीव देयकासंदर्भात पुणे महापालिकेशी संपर्क साधण्याचे आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन !

देयकांच्या लेखापरीक्षणासाठी महापालिकेने ३० रुग्णालयांत आपले कर्मचारी नियुक्त केले आहेत. या व्यतिरिक्त भरारी पथकेही सिद्ध करण्यात आली आहेत.

नगरमध्ये मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी कसायांच्या कह्यातून केली १४ गायींची सुटका !

कसायांकडून स्वामी यांच्या गाडीवर आक्रमण आणि त्यांना ठार मारण्याची धमकी

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने ७ सहस्र ३०० रुपयांचा दंड !

भारतात अशी कारवाई कधीच होऊ शकत नाही, असेच जनतेला वाटेल !

ऑक्सिजनच्या मागणी-पुरवठ्यासंदर्भातील २ नवीन अ‍ॅप्सचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण !

यामध्ये ऑक्सिजन पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी तसेच मागणी पुरवठ्याचा अंदाज घेण्यासाठी ऑक्सिचेन या अ‍ॅपचा उपयोग होईल, तर ऑक्सिविन अ‍ॅपमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनवर आधारित माहिती ३ रंगांच्या श्रेणीमध्ये दिसेल.

उडुपी (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून शेजारील हिंदूच्या गायीची चोरी करून हत्या !

शेजारी कोणत्या मानसिकतेचे लोक रहातात आणि भविष्यात ते जिवालाही धोका निर्माण करू शकतात, याचा विचार करून हिंदूंनी स्वरक्षणासाठी नेहमीच सिद्ध रहायला हवे, हेच ही घटना दर्शवते !

अलगीकरणाचे नियम न पाळल्याने पाकने भेट म्हणून पाठवलेले आंबे स्वीकारण्यास अनेक देशांचा नकार !

पाकची जगभरात नाचक्की ! ‘पाकची आतंकवादी वृत्ती पहाता तो आंब्यांच्या नावाखाली बॉम्ब पाठवण्याच्या भीतीमुळे तर या देशांनी पाकचे आंबे स्वीकारण्यास नकार दिला नाही ना ?’, असे कुणाला वाटल्यास चूक काय ?

‘फेसबूक’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या ‘पेज’वरील बंदी उठवण्यास भाग पाडा !

पनवेल (रायगड) येथील धर्मप्रेमी श्री. गिरीश ढवळीकर यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे आवाहन !

यंदाही हज यात्रेला अन्य देशांतील नागरिकांना येण्यास सौदी अरेबियाकडून बंदी !

असे आहे, तर केरळमधील हज यात्रेकरूंना प्राधान्याच्या सूचीत घेऊन त्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केरळ सरकार रहित करील का ?

ज्या डॉक्टरांनी अंतिम परीक्षाच दिलेली नाही, त्यांच्याकडे रुग्णांचे दायित्व कसे सोपवता येईल ? – सर्वोच्च न्यायालय

देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय (पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल) अंतिम परीक्षा रहित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आम्ही परीक्षा रहित करण्याचा आदेश देऊ शकत नाही; कारण हे शैक्षणिक धोरणाचे प्रकरण आहे.