(म्हणे) ‘मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला कोणतेही वैज्ञानिक कारण नाही !’ – अभिनेत्री सायली संजीव

वटपौर्णिमेनिमित्त व्रतवैकल्ये आणि अध्यात्म यांविषयी अभ्यास नसलेल्या अभिनेत्रीचे व्याख्यान ठेवून अंनिसचा हिंदूंना संभ्रमित करण्याचा प्रयत्न !

संभाजीनगर येथे मोठ्या बहिणीची छेड काढणार्‍या टवाळखोराला धाकट्या बहिणीने दिला चोप !

महिलांनो, अशा प्रकारे टवाळखोरांना धडा शिकवून सुरक्षित रहा !

कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार सांगली जिल्हा चौथ्या स्तरात !

जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत चालू असेल. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार बंद रहातील.

पुणे महापालिकेची २ कोटी रुपयांची बँक हमी जप्त करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश !

कचरा डेपोत २०० मेट्रिक टन कचरा प्रकिया प्रकल्प चालू करण्याच्या हालचाली चालू असल्याचे याचिकाकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यावर त्यावर नवीन कचरा प्रक्रिया चालू करणार नाही, असे निवेदन पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिले आहे.

अयोध्येच्या विकासाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अयोध्या विकास प्राधिकरणा’ची २७ जून या दिवशी ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली.

कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकारामुळे नियमांचे काटेकोर पालन करा ! – जागतिक आरोग्य संघटना

प्रथम भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या ‘डेल्टा’ या प्रकाराचे जगातील जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या प्रकारांमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संसर्ग होणारा आहे.

आतंकवादाला समर्थन आणि आश्रय देणारे देश दोषी !

जागतिक स्तरावर पाकचे नावही न घेणारा भारत कधीतरी पाकपुरस्कृत आतंकवाद आणि पाक यांना नष्ट करण्याचे धाडस दाखवू शकेल का ? भारताच्या अशा मुळमुळीत भूमिकेमुळे देशात गेली ३ दशके चालू असलेला जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हीच वस्तूस्थिती आहे !

खरे देशभक्त असलेले लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे.

पाकिस्तान एफ्.ए.टी.एफ्.च्या काळ्या सूचीमध्ये जाण्यापासून पुन्हा बचावला !

मुळात जागतिक देशांनी पाकला ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे ! भारतानेही तशी सातत्याने मागणी केली पाहिजे !

भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका जुलै २०२२ मध्ये कार्यान्वित होणार ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

सिंह या वेळी म्हणाले की, भारतासाठी ही युद्धनौका अभिमानास्पद असून ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल.