सिंहभूम (झारखंड) येथील ‘मदर तेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये गेल्या ४ वर्षांपासून अनेक मुलींचे लैंगिक शोषण

गेली ४ वर्षे पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? अशा प्रकारच्या आश्रयगृहातून अयोग्य कृती होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येऊनही त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात का येत नाही ?

छडवेल (नंदुरबार) जिल्हा मध्यवर्ती बँकेतील हिंदुद्वेषी कर्मचारी नामदेव बच्छाव यांच्याकडून श्री दत्ताचे चित्र रस्त्यावर फेकून त्यावर बूट घालून उभे राहून अवमान !

हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूंच ! अशांवर कठोर कारवाई होईपर्यंत ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने लढा द्यावा आणि त्यासाठी समस्त हिंदूंनीही त्यांना साथ द्यावी !

कर्नाटकातील हिंदूंच्या मंदिरांसाठी राखून ठेवलेला निधी अन्य धार्मिक संस्थांवर खर्च केला जाणार नाही !

कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय विभागाचा निधी ज्याला ‘मुजराई विभाग’ म्हणून ओळखले जाते, त्याचा पैसा यापुढे कोणत्याही अहिंदु धार्मिक संस्थांना देण्यासाठी वापरला जाऊ नये, असा आदेश कर्नाटक सरकारने दिला आहे.

मंदिरांची भूमी सदैव मंदिरांकडेच राहील ! – मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मंदिरांना दान देणार्‍यांच्या इच्छेविरुद्ध भूमी कुणाला देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांच्या भूमीवर ज्या समुदायातील लोकांचे हित सामान्यतः अवलंबून असते, अशा प्रकरणांमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

सूर्यग्रहणामुळे जगात युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिषाचे भविष्यकथन

‘आज तक’ वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ज्योतिषाचार्य कमल नंदलाल यांच्या भविष्यकथनानुसार याचा संपूर्ण जगामध्ये अनिष्ट परिणाम दिसून येणार आहे.

चिनी अ‍ॅप्सद्वारे २४ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या टोळीला अटक

भारत सरकारने आता चीनच्या प्रत्येक अ‍ॅपवर देशात बंदी घातली पाहिजे, हेच यावरून लक्षात येते !

गीता प्रेसला कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट नाही !

आर्थिक संकटामुळे गीता प्रेस बंद होणार असल्याच्या बातम्यांवर खासदार रवि किशन यांनी केले आश्‍वस्त !

भाजपला वर्ष २०१९-२० मध्ये ७८५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या !

निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार वर्ष २०१९-२० मध्ये भाजपला ७८५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला १३९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

इंधन दरवाढीच्या माध्यमातून सरकार जिझिया कर वसूल करत आहे ! – पृथ्वीराज चव्हाण

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अल्प होत आहेत; मात्र भारतामध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये, तर डिझेलचे ९२ रुपयांपेक्षा अधिक आहेत.

फलटण (जिल्हा सातारा) येथे जिवंत युवकाला केले मृत घोषित

असंवेदनशील फलटण आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार !