सांगली, २ जून (वार्ता.) – कोरोनामुळे अनेकांची स्थिती गंभीर झाली आहे. अनेकांची पुंजी संपली आहे. हे ओळखून सौ. मोनिका करंदीकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री. मंगेश ठाणेदार आणि श्री. सचिन परांजपे यांच्या विशेष प्रयत्नातून ‘इन्फोसिस स्पर्श फाऊंडेशन’, अन् मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने गरजू कुटुंबाना १ मास पुरेल इतके अन्नधान्य साहित्याचे वाटप करण्यात आले. १ जून या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला.
सांगली पोलीस दलाला १५ ‘ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर’ देण्यात आले. याचसमवेत सौ. मोनिका करंदीकर आणि श्री. अतुल शहा यांच्या विशेष प्रयत्नांतून कलाकारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.