दुधाला आधारभूत किंमत देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन !

नगर जिल्ह्यात किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथे आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्‍यांनी गावातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली.

पूर्वसूचना न देता ‘फेसबूक’ची पाने बंद केल्याच्या कृतीला सनातन संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान !

‘फेसबूक’ने या याचिकेवर युक्तीवाद करण्याची सिद्धता दर्शवली असून या याचिकेवरील सुनावणी ८ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल मंदिरात १ सहस्र वर्षांपूर्वीच्या विविध धातूंच्या मूर्ती दर्शनासाठी ठेवणार !

श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री गणपति, श्रीविष्णु, श्रीकृष्ण, बालाजी अशा अनेक देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत.

नगर येथे अवैध वाळू उपसा विरोधात ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी यांचे आंदोलन !

रात्रंदिवस वाळू उपसा होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यांना रात्रीची झोपही अशक्य झाली आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रातील पुरातन घाट आणि मंदिरे यांना धोका निर्माण झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पुणे येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या नायजेरियाच्या तरुणाला अटक !

नायजेरियाच्या तरुणाला कोकेनच्या विक्रीप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.

पाकच्या ग्वादर बंदरामधील समुद्रात चिनी नौकांकडून होणार्‍या मासेमारीचा पाकिस्तानी मच्छीमारांकडून विरोध

पाक सरकारचे विरोधाकडे दुर्लक्ष !

मुलींना बारावीपर्यंत शिक्षण विनामूल्य असतांनाही त्यांच्याकडून शुल्क घेत असल्याची वस्तूस्थिती !

या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, म्हणजे अशा शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करता येईल, असे शिक्षण विभागातील तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. 

बीड येथे आरोग्य कर्मचार्‍यांनी अजित पवार आणि राजेश टोपे यांचा ताफा अडवला !

आम्हाला नोकरीवरून काढण्यात आले, असा आरोप आंदोलकांनी केला.

इस्कॉनच्या वतीने १९ ते २१ जून ऑनलाईन नॅशनल युथ फेस्टीव्हल !

२५ लाख युवकांचा विश्‍वविक्रमी सहभाग 

‘पृथ्वीराज’ चित्रपटाला विरोध करण्यासाठी चंडीगड येथे अभिनेते अक्षय कुमार यांचा पुतळा जाळला !

दुसरीकडे करणी सेनेकडून चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ हे नाव पालटून ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.