गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच आगामी महापालिका निवडणूक लढवणार ! -प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १० जून या दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवली जाते ! – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

मुख्यमंत्री १० मास मंत्रालयात जात नाहीत त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला दाखवून देतील, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !

फेसबूककडून हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना यांच्या पानांवर घातलेल्या बंदीचा राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याकडून ट्विटरवरून विरोध !

तोरणा गडासह इतर राज्य संरक्षित स्मारकांवर यापुढे कुणालाही मुक्काम करता येणार नाही !

तोरणा गडावरील तटबंदीच्या संवर्धन कार्यातील ३ फुटांचा काही भाग तसेच कोकण दरवाजा येथील भिंतीच्या काही भागास उपद्रवी पर्यटकांकडून हानी पोहोचवण्यात आली होती. याची नोंद घेऊन वेल्हा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता.

महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची लूट करून विमा आस्थापनांना मालामाल केले ! – अनिल बोंडे, माजी कृषीमंत्री

केंद्रशासनाने पंतप्रधान विमा योजना लागू केली आहे. त्याची महाविकास आघाडी सरकारने कार्यवाही न करता खासगी विमा आस्थापना नेमून शेतकर्‍यांची लूट केली, तसेच विमा आस्थापनांना मालामाल केले आहे.

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे कोरोनाचा संसर्ग अल्प होण्यासाठी मंत्रोपच्चारात प्राणवायू फेरी !

वातावरण शुद्ध होऊन कोरोनाचा प्रभाव नष्ट व्हावा यांसाठी अग्निहोत्र धूपन फिरवण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरात याचा वापर करावा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा निर्मिती होईल, असे आवाहन या वेळी युवकांनी केले.

पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात मग पायी वारी का नको ? – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

राज्या सरकारने पुन्हा एकदा पायी वारीवर बंधने घालून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात, तर मग पायी वारी का नको ? असा प्रश्‍न वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी केला आहे.

फेसबूकच्या हिंदुद्वेषामागे अमेरिकेतील ‘टाइम’ नियतकालिकाचा हात !

हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात नियतकालिके आणि सनातन शॉप यांच्या फेसबूक पानांवरील मजकुराची वस्तुनिष्ठ शहानिशा न करताच फेसबूककडून ही अन्याय्य कारवाई करण्यात आली, हे लक्षात घ्या !

अभिनेते रणवीर सिंह यांच्याकडून ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या रंगमंचावर भूत दिसल्याचा दावा !

याविषयी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना काय म्हणायचे आहे ? आता ‘विज्ञानवादी’ कुणाला म्हणायचे  ? या घटनेला ‘अंधश्रद्धा’ ठरवून मोकळे होणार्‍यांना कि या सूक्ष्म शक्तींविषयी संशोधन करून त्यामागील सत्य जाणून घेणार्‍यांना ? हे जनतेला ठाऊक आहे.  

शिवीगाळ केल्याप्रकरणी सातारा येथे बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश

अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि पालिका मुख्याधिकार्‍यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी बांधकाम सभापती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत.