विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हॅशटॅग ट्रेंड  !

विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. येथील प्राचीन मंदिराची पडझड झाली आहे आणि मूर्ती भंगल्या आहेत. याउलट येथील रेहान दर्ग्यासाठी सरकारकडून रस्ता बांधून लाखो रुपयांचा निधी दिला गेला आहे आणि जात आहे.

भारताने अल्प केली शस्त्रास्त्रांची आयात !

‘मेक इन इंडिया’च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रास्त्रांची आयात अल्प करण्यावर भर दिला आहे.

भाजपचे खासदार शर्मा यांची देहलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राम स्वरूप शर्मा हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमधील न्यायाधिशांकरता संमत झालेल्या १ सहस्र ८० जागांपैकी ४१९ पदे रिक्त !

भारतीय न्यायालयांमध्ये न्यायाधिशांच्या कमतरतेची समस्या गंभीर झाली आहे.

ऑस्ट्रेलियातील ऑरेंज शहरात उंदरांचा सुळसुळाट : प्लेग पसरण्याची भीती

न्यू साऊथ वेल्सच्या मध्य पश्‍चिमेतील ऑरेंज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. शेकडो उंदरांनी रस्ते, घरे आणि पीक येथे आक्रमण केले आहे.

स्वयंसेवी संस्था चालवणार्‍या महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, त्या कसले संस्कार करणार ? – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! ती शिकवली असती, तर जनतेमध्ये नैतिकता निर्माण होऊन सुसंस्कृत समाज निर्माण झाला असता !

देशात साडेतीन कोटी लसींच्या डोसचा वापर, तर परदेशांना ५ कोटी ८४ लाख डोसची निर्यात  !

‘देशात लसीचा भरपूर साठा असून येथील लोकांची गरज भागवून इतर देशांना लस निर्यात केली जात आहे’ – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे

‘नेटफ्लिक्स’चे दुष्परिणाम !

जसे एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून उत्सर्जित होणारे विषारी पदार्थ झाडांसाठी हानीकारक ठरतात, तसाच काहीसा प्रकार नेटफ्लिक्सच्या संदर्भात होत आहे.

सातारा येथील नारायण सारंगकर यांची पोलीस निरीक्षक पदावरून १ वर्षासाठी पदावनती !

वादग्रस्त ठरलेले शहर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे पोलीस विभागीय चौकशी अंतर्गत वेगवेगळ्या दोषारोपांपैकी ३ दोषारोपांमध्ये दोषी आढळून आले आहेत. यामुळे पोलीस महासंचालकांनी १ वर्षासाठी सारंगकर यांना पदावनतीची शिक्षा ठोठावली आहे.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने केले घंटानाद आंदोलन !

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, प्रवक्ते, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती