ऑस्ट्रेलियातील ऑरेंज शहरात उंदरांचा सुळसुळाट : प्लेग पसरण्याची भीती

प्रतीकात्मक छायाचित्र

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – न्यू साऊथ वेल्सच्या मध्य पश्‍चिमेतील ऑरेंज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. शेकडो उंदरांनी रस्ते, घरे आणि पीक येथे आक्रमण केले आहे. यामुळे तेथे प्लेग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एका घरात २५० उंदीर पकडले गेले आहेत. एका कुटुंबातील कुत्र्याने २ दिवसांत २०० हून अधिक उंदरांना ठार केले आहे. उंदीर गुरांच्या चार्‍यामधील धान्य किंवा बिया खातात. त्यांचे मूत्र आणि मल गवतात पसरते. असा चारे गुरे खात नाहीत. यामुळे गुरे आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यूदेखील होतो.