विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हॅशटॅग ट्रेंड  !

मुंबई – विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. येथील प्राचीन मंदिराची पडझड झाली आहे आणि मूर्ती भंगल्या आहेत. याउलट येथील रेहान दर्ग्यासाठी सरकारकडून रस्ता बांधून लाखो रुपयांचा निधी दिला गेला आहे आणि जात आहे. याला ‘विशाळगड संरक्षण आणि अतिक्रमण विरोधी कारवाई समिती’ने वाचा फोडल्यावर ट्विटरवर विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तो १९ व्या क्रमांकावर होता. यावर १५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट केले. या हॅशटॅग समवेत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘पुरातत्व विभाग’ हे २ शब्दही या ट्रेंडिंगमध्ये होते. ट्वीट्स करणार्‍या धर्मप्रेमींनी विशाळगडाच्या दुर्दशेसाठी पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच तेथील सर्व अतिक्रमणे हटवण्याचीही मागणी केली.