स्वयंसेवी संस्था चालवणार्‍या महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, त्या कसले संस्कार करणार ? – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! ती शिकवली असती, तर जनतेमध्ये नैतिकता निर्माण होऊन सुसंस्कृत समाज निर्माण झाला असता !

तीरथ सिंह रावत

नवी देहली – आजकाल स्वयंसेवी संस्था चालवणार्‍या महिला फाटलेल्या जीन्स (अशा जीन्स परिधान करण्याची फॅशन आहे.) घालून फिरतात, हे सगळे योग्य आहे का ? त्या कसले संस्कार करणार? असे प्रश्‍न उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेत केले.

१.  मुख्यमंत्री रावत यांनी या वेळी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. ते  म्हणाले की, एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्या वेळी मी पाहिले की, एक महिला तिच्या २ मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारले, ‘कुठे जायचे आहे ?’ यावर ती म्हणाली ‘देहलीला.’  महिलेचा पती जे.एन्.यू.मध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, ‘जी महिला स्वयंसेववी संस्था चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते, अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल ?’ जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असे नव्हते.

२. ‘तरुणांमध्येही व्यसन वाढत चालले आहे. नशेसमवेतच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावे लागेल. तसेच पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर रहावे लागेल’, असेदेखील रावत यांनी म्हटले.