भारताने अल्प केली शस्त्रास्त्रांची आयात !

नवी देहली – ‘मेक इन इंडिया’च्या पुढाकारानंतर भारताने शस्त्रास्त्रांची आयात अल्प करण्यावर भर दिला आहे. वर्ष २०११ ते २०१५ आणि वर्ष २०१६ ते २०२० यांची तुलना केली, तर देशाची शस्त्र आयात ३३ टक्क्यांनी घटली आहे. याचा सर्वाधिक फटका रशियाला बसला आहे; कारण भारत रशियाचा शस्त्र खरेदीसाठीचा मोठा ग्राहक आहे. तसेच अमेरिकेसमवेतची शस्त्र आयात ४६ टक्क्यांनी अल्प केली आहे. दुसरीकडे आशिया खंडात शस्त्रांंची सर्वाधिक आयात करणार्‍या देशांमध्ये पाकिस्तानचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युटच्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे.

वर्ष २०१६ ते २०२० या ४ वर्षांमध्ये चीनकडून होणार्‍या शस्त्र निर्यातीत ७.८० टक्के घट झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे. शस्त्रांंच्या निर्यातीत चीन जगात ५ व्या क्रमांवर आहे. पाकिस्तान सर्वाधिक चिनी शस्त्रांवर अवलंबून आहे.