पेण येथे शिवप्रतापदिनानिमित्त मातृ-पितृ इच्‍छापूर्ती दिवस साजरा !

भगव्‍या ध्‍वजाचे पूजन करून श्री तुळजाभवानीच्‍या मंदिरामध्‍ये गोंधळ, शौर्यगीते, तसेच देवीची आरती म्‍हणण्‍यात आली. या वेळी अफझलखानवधाचे प्रतीक म्‍हणून अफझलखानाचे मातीचे मुंडके आई तुळजाभवानीच्‍या चरणी वहाण्‍यात आले. सर्व धारकर्‍यांनी पदयात्रेत उत्‍साहपूर्ण वातावरणात घोषणा दिल्‍या, तसेच शौर्यगीतांसह पदयात्राही पार पडली.

७ मातांच्या रक्षणासाठी हिंदूंचा जन्म झाला आहे ! – पू. भिडेगुरुजी

भारतमाता, गोमाता, गंगामाता, वेदमाता, भवानीमाता, जिजामाता आणि जन्मदाती माता या ७ मातांच्या रक्षणासाठी हिंदूंचा जन्म झाला आहे, याची जाणीव हिंदूंच्या मनामनात निर्माण व्हावी.

वाशी आणि सानपाडा येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त २८ मार्च या दिवशी वाशी, तुर्भे, सानपाडा परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर बंदी घाला !

गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर देशव्यापी बंदी घालावी. ज्यायोगे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारित होणार नाही असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आले आहे.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने केले घंटानाद आंदोलन !

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, प्रवक्ते, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती