मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाचे दायित्व देण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
यासह रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे दायित्व देण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १७ मार्च या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन १ घंटा चर्चा केली. या बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी पोलीसदलात झालेल्या या स्थानांतराची माहिती दिली.