केरळमधील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात आयोजित उत्सवात धार्मिक विधी करण्यावर प्रशासनाकडून बंदी !

केरळमधील साम्यवादी सरकारच्या काळात हिंदूंच्या धार्मिक विधींवर बंदी घातली जाणे हा हिंदुद्वेषच होय ! अन्य धर्मियांच्या एखाद्या धार्मिक कृतीवर बंदी घालण्याचे धाडस साम्यवादी सरकार दाखवेल का ?

त्रिशूर (केरळ) – केरळ सरकारने कोरोना महामारीचे कारण सांगत राज्यातील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात हिंदु भाविकांना फार पूर्वीपासून चालू असलेले धार्मिक विधी करण्यास बंदी घातली. भाविकांना विधी करता येऊ नयेत; म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. धार्मिक विधीवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासन आणि मंदिरातील शासकीय कर्मचारी यांनी हिंदु भाविकांशी सल्लामसलत न करता मनमानीने घेतला आहे.

१. भद्रकाली मंदिर हे मूळतः एक शिवमंदिर होते. भगवान परशुरामांनी स्वत: भगवान शिवाच्या जवळ कालीमातेची मूर्ती स्थापित केली, अशी मान्यता आहे. हे मंदिर चेर वंशीय राजांच्या काळात महत्त्वाचे मंदिर होते आणि कोडुंगल्लूर ही त्यांची राजधानी होती.

२. प्रतिवर्षी मार्च मासात ‘मीना भरणी’ उत्सवात अंगात दैवी संचार येणारी मंडळी कोडूंगल्लूर येथील श्री कुरुंबा भगवती मंदिरात जातात. ते त्यांच्या पारंपरिक पोशाखात मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि अंगात दैवी संचार होताच स्वतःच्या कपाळावर विळ्याच्या आकाराच्या शस्त्राने वार करतात. त्यांच्या जखमांवर हळद पूड लावल्यावर ती जखम भरते. ‘दैवी कृपेमुळे जखम बरी होते’, अशी त्यांची श्रद्धा आहे.

३. ‘रिक्लेम टेंपल्स’ या हिंदु संघटनेच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी शनावास यांनीच या धार्मिक विधींवर बंदी घातली. (असे अधिकारी भारताचे कि पाकचे ? – संपादक) मंदिरात भाविक आणि अंगात दैवी संचार येणारी मंडळी यांना कोणतेही अनुष्ठान करता येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचे कुमक तैनात करण्यात आले होते. (धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी कधी अशा प्रकारे बंदोबस्त केला जातो का ? – संपादक)

४. ‘स्थानिक हॉटेलांमध्ये भाविकांना खोल्या भाड्याने देऊ नयेत’, अशी चेतावणी पोलिसांनी हॉटेल मालकांना दिली आहे. शहरात दाखल होणारी वाहनेही पोलीस थांबवत आहेत आणि त्यांना परत पाठवले जात आहे. मंदिराच्या आजूबाजूला कोणतीही दुकाने उघडण्यास अनुमती नाही. केरळ पोलिसांनी संपूर्ण शहर नियंत्रणात घेतले आहे आणि तेथील स्थानिकांना त्यांच्या घरी अतिथींना रहाण्यास अनुमती देऊ नये, अशी चेतावणीही दिली आहे.

५. नुकतेच भद्रकाली देवीला प्राण्यांच्या बळीसह अन्य परंपरा, प्राणी हक्क आणि धार्मिक गोष्टींमध्ये काळानुसार सुधारणा यांचा हवाला देऊन थांबवण्यात आल्या आहेत. (केरळमध्ये हिंदूच्या धार्मिक परंपरा कशा मोडित काढल्या जात आहेत, हे यातून लक्षात येते. हे रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक ! – संपादक)