महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !
टेक्सास (अमेरिका) – गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील टेक्साससारख्या दक्षिण भागात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टी आणि हिमवादळ यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमवादळामुळे अमेरिकेतील पॉवर ग्रीडची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे येथील ५ लाख नागरिकांच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पाणीपुरवठा करणार्या छोट्या जलवाहिन्या गोठल्या आहेत. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या भागात आणीबाणी घोषित केली आहे.
Millions without power and 21 dead as ferocious winter weather sweeps US https://t.co/uMfEouWNhF
— Guardian Australia (@GuardianAus) February 17, 2021
१. हवामान खात्याने आगामी २४ घंट्यांमध्ये वर्जिनियापासून ते दक्षिण पेन्सिल्वेनिया भागात, तसेच उत्तर कॅरिलोना, वॉशिंग्टन डीसी आणि फिलाडेल्फियामधील काही भाग येथे गंभीर स्वरूपात हिमवृष्टी होण्याची चेतावणी दिली आहे.
२. टेक्सासमधील सुपरमार्केटमधील खाद्यान्न आणि पदार्थ संपले आहे. जवळपास ७० लाख लोकांना गरम पाण्याची आवश्यकता आहे. भूकेने व्याकूळ झालेल्या लोकांना अन्नासाठी अन्नछत्रांसमोर ४ घंटे रांगेत उभे रहावे लागत आहे. ह्युस्टन शहरात लोकांना खाद्यपदार्थांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे लोकांना खराब झालेले अन्न खाऊन पोट भरावे लागत आहे. पाणी असलेल्या भागात थंड पाणी पिऊन आजारी पडणे अथवा पाण्याविना रहाणे हे दोनच पर्याय नागरिकांसमोर आहेत. ह्युस्टनची परिस्थिती आफ्रिकेसारखी झाली आहे.