माझ्या यशात भारतीय संस्कारांचा सर्वांत मोठा वाटा !

 ‘नासा’च्या मंगळ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वाती मोहन यांचे प्रतिपादन !  

किती भारतीय शास्त्रज्ञ, संशोधक असे म्हणतात ? याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे तोंड उघडणार नाहीत !

सौजन्य- ( द बेटर इंडिया)

वॉशिंग्टन (अमेरिका) – नासाचे ‘पर्सीवरेन्स’ रोव्हर मंगळावर यशस्वीरित्या उतरण्यातील माझ्या सहभागामध्ये भारतीय संस्कारांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे, असे प्रतिपादन अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन यांनी या घटनेनंतर केले. रोव्हर यशस्वीरित्या लँड केल्याची सर्वांत पहिली माहिती फ्लाइट कंट्रोलर स्वाती मोहन यांनी दिली. स्वाती मोहन या नासामध्ये गाइडेन्स, नेव्हीगेशन आणि कंट्रोल्स ऑपरेशनच्या प्रमुख आहेत. स्वाती मोहन एक वर्षाच्या असतांना त्यांचे कुटुंब अमेरिकत स्थायिक झाले.

स्वतःच्या यशातून भावी पिढीला मार्गदर्शन करतांना त्यांनी म्हटले की, स्वतःची  जिद्द पूर्ण करण्यासाठी त्यावर ठाम रहा. कुठलाही एक अनुभव किंवा एक यश तुम्हाला पुष्कळ यशस्वी किंवा पराभूत करू शकत नाही. यश असो की अपयश त्या अनुभवातून तुम्ही काय आणि कसे शिकलात हे सर्वांत महत्त्वाचे असते. हे अनुभव तुम्हाला पुढे जाण्यास साहाय्य करतात.